मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील निर्णायक आणि शेवटचा सामना आज खेळायला जाणार आहे. हा सामना बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. या निर्णायक सामन्यात बाबत बोलताना माजी खेळाडू वसीम जाफरने सांगितले की, बंगळुरू येथे होणार्या शेवटच्या टी-२० सामन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत सरस आहे. भारतीय संघाने मागील दोन सामन्यात ज्याप्रकारे विजय मिळवला आहे ते पाहता पाहुणा संघ नक्कीच दबावाखाली असेल. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंवर दुखापतीचे सावटही पहायला मिळाले. त्यांच्या प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीमुळे पुनरागमन करणे त्यांच्यासाठी कठीण जाईल, असे जाफरचे मत आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र त्यानंतर भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करत तिसरा सामना ४८ धावांनी आणि चौथा सामना ८२ धावांनी जिंकला.
राजकोट येथे शुक्रवारी झालेल्या सामन्यात कर्णधार टेम्बा बावुमा आणि मार्को जॅन्सेन त्यांना दुखापत झाली आहे. याआधी यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकही दुखापतीमुळे काही सामन्यांतून बाहेर पडला होता. ईएसपीएन क्रिकइन्फोवर बोलताना जाफर म्हणाला की,
‘बंगळुरूमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यात भारताचा वरचष्मा असेल, कारण त्यांचे मागील दोन्ही विजय मोठ्या फरकाने झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेने पहिले दोन सामने इतक्या सहज जिंकूनही त्यांना मागील दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. त्यातच आता कर्णधार बावुमा आणि मार्को जॅन्सेनला दुखापत झाल्याची संघाला चिंता आहे. या संघाचा प्रमुख खेळाडू एडन मार्कराम मालिका सुरु होण्या अगोदर सांगा बाहेर पडला होता. त्यामुळे मला वाटते की भारत या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर वरचढ आहे.’ एडन मार्कराम टी-२० मालिकेपूर्वी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तो मालिकेतून बाहेर पडला होता.
भारतीय संघात कोणताही बदल अपेक्षित नाही
गेल्या सामन्यात बेंचवर बसलेल्या काही खेळाडूंना संधी देण्याबाबतही जाफरला विचारण्यात आले. त्यांनी श्रेयस अय्यरच्या जागी दीपक हुडाचा समावेश करण्याचे त्याने सुचवले. पण सलग दोन विजयानंतर असे होण्याची शक्यता कमी असल्याचेही त्यांनी सांगितले.
तो म्हणाला की, ‘पहिल्या दोन पराभवांनंतर भारतीय संघात काही बदलांची अपेक्षा होती. पण भारताने कोणतेही बदल केले नाहीत. त्यामुळे दोन सामने जिंकल्यानंतर संघात काही बदल होईल असे मला वाटत नाही. जर आपल्याला काही बदल करायचे असतील तर श्रेयस अय्यरच्या जागी दीपक हुड्डा असू शकतो कारण त्याने आयपीएलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. दिपकने या स्थानावर फलंदाजी करताना चांगली कामगिरीही केलेली आहे. पण भारतीय संघ ज्या पॅटर्नने खेळत आहे, त्यात आम्हाला अधिक सातत्य पाहायला मिळेल, असे मला वाटते.’
महत्वाच्या बातम्या: