मुंबई : जूनमध्ये होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी (IND vs SA) दक्षिण आफ्रिकेने टी-२० संघ जाहीर केला आहे. मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीतील फलंदाज ट्रिस्टन स्टब्सची प्रथमच राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ ते १९ जून दरम्यान ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. गेल्या वर्षी य़ूएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरीत गमवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्धची पहिली टी-२० मालिका असेल. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक होणार आहे. यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. या गटात पाकिस्तान आणि बांगलादेशचाही समावेश आहे.
ट्रिस्टन स्टब्सशिवाय वेगवान गोलंदाज एनरिक नोर्कियाचे पुनरागमन झाले असून तो दुखापतीमुळे गेल्या वर्षी डिसेंबरपासून संघाबाहेर आहे. तो सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. नॉर्कियाशिवाय रीझा हेंड्रिक्स आणि हेन्रिक क्लासेनही परतले आहेत. अनुभवी अष्टपैलू खेळाडू वेन पारनेलचेही ५ वर्षांनंतर टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. तो शेवटचा २०१७च्या इंग्लंड दौऱ्यावर खेळला होता. भारत दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या १६ सदस्यीय संघात आयपीएल खेळणाऱ्या ९ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
#BreakingNews 🚨
South Africa announce T20Is squad for India series 🏏📸: CSA#INDvsSA #SAvsIND #SouthAfrica #CricketTwitter pic.twitter.com/NGx09oVrAK
— SportsTiger (@sportstigerapp) May 17, 2022
भारत विरुद्ध टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ :
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, वेन पारनेल, एनरिक नॉर्किया, ड्वेन प्रिटोरियस, कॉगिसो रबाडा, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रासी व्हॅन डर डुसेन, मार्को यानसेन.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com