IND vs SA 2022: मोठी बातमी! दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; पाहा कोणाला मिळाली जागा?

मुंबई : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका ५ टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हि मोठी बातमी असणार आहे, कारण बऱ्याच दिवसापासून चाहत्यांना आस लागली होती कि या मालिकेसाठी कोणत्या युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. बीसीसीआयने संघ निवड करताना आयपीएल स्पर्धेतील कामगिरीचाही विचार केलेला पाहायला मिळत आहे.

टी२० मालिकेसाठी घोषित झालेल्या संघामध्ये दिनेश कार्तिकने त्याच्या आयपीएल मधील चांगल्या कामगिरीच्या बळावर पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवले आहे. तर युवा खेळाडूंमध्ये उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांना पदार्पण करण्याची संधी मिळणार आहे. मागील काही दिवसापासून क्रिकेट चाहत्यांच्या मनात असलेले नाव म्हणजे उमरान मलिकला संघात सामील करण्यात आले आहे. आता सर्वांचे लक्ष उमरानच्या कामगिरीकडे असणार आहे. तसेच संघाचे कर्णधारपद शिखर धवनकडे दिले जाईल अशी चर्चा होती मात्र या युवा संघाची जबाबदारी बीसीसीआयने केएल राहुलकडे सोपवली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ

केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com