सामन्याआधीच पाकिस्तानचा सावध पवित्रा, निकाल स्वीकार करण्याचा इम्रान खान यांचा सल्ला

टीम महाराष्ट्र देशा : विश्वचषकातील सगळ्यात रोमांचक आणि लक्षवेधी असा भारत वि.पाकिस्तान सामना आज मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानवर होणार आहे. या सामन्यासाठी चाहत्यांनी जय्यत तयारी केली असून मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदान देखील सज्ज झाले आहे. कारण गेले दोन दिवस मँचेस्टर शहरात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे आजचा सामना होईल का? असा प्रश्न चाहत्यांना आणि आयसीसी क्रिकेट मंडळला पडला होता. मात्र मँचेस्टर येथीस सद्यस्थिती पाहता सूर्यानं सकाळच्या सत्रात दर्शन दिले आहे. सद्य स्थितीला पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामन्यावरचे पावसाचे सावट तूर्तास तरी टळले आहे. मात्र दुपारनंतर पावसाचे संकेत असणार आहेत.

जगातील अनेक देशातून क्रिकेट चाहत्यांनी आणि खासकरून भारतीय आणि पाकिस्तानी चाहत्यांनी आजच्या भारत – पाक सामन्यासाठी मँचेस्टरमध्ये हजेरी लावली आहे. त्यामुळे मँचेस्टरमध्ये उत्साहवर्धक आणि रोमांचक वातावरण तयार झाले आहे. विश्वचषकातील भारत- पाकिस्तान सामना हा प्रतिष्ठेचा सामना मानला जातो त्यामुळे दोन्ही देशांच्या संघाकडून या सामन्यासाठी जोरदार तयारी केलेली असते. मात्र असे असले तरी आतापर्यंत वर्ल्डकप स्पर्धेत सहावेळा भारत – पाकिस्तान संघ समोरासमोर आले आहेत आणि प्रत्येक वेळी भारतानं पाकिस्तानला धूळ चारली आहे. त्यामुळे या सामन्यातही भारतीय संघ विजयी होईल, अशी शक्यता कोट्यवधी भारतीयांकडून व्यक्त होत आहे.

Loading...

मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संघाला शुभेच्छा देत जो निकाल येईल तो स्वीकार करण्याचा सल्ला दिला आहे. तर शेवटच्या चेंडू पर्यंत लढण्याची जिद्द ठेवण्याचा मंत्र देखील पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....