IND vs Pak World Cup 2022 नवी दिल्ली : T20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला अवघे काही तास उरले आहेत. दोन्ही संघांचा सुपर 12 मधील हा पहिलाच सामना आहे. T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानविरुद्ध 5-1 असा विजयी विक्रम आहे. गेल्या वर्षी T20 विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये शेवटचा सामना झाला होता, ज्यामध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकात संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. मात्र, या सामन्यावरही पावसाचे संकट आहे.
टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर पावसाचे संकट पसरले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला मेलबर्नमध्ये जोरदार पाऊस झाला. बुधवारी आणि गुरुवारीही पाऊस सुरूच (Weather Report) होता. स्थानिक हवामान खात्यानुसार, भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या दिवशी पावसाचा अंदाज आहे.
या ‘ब्लॉकबस्टर’ सामन्यापूर्वी हे दोघे गेल्या महिन्यात आशिया चषकात आमनेसामने आले होते. भारताने गट टप्प्यातील सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला, तर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने शानदार पुनरागमन करत सुपर 4 टप्प्यात भारताचा पराभव केला होता.
दोन्ही देशांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
पाकिस्तानी संघ:
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद
महत्वाच्या बातम्या :
- MPSC Recruitment | MPSC च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सरकारकडून दिवाळी भेट, ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Keshav Upadhey | “…पण काही प्रश्नांची उत्तरे ही द्या”, केशव उपाध्ये यांचे उद्धव ठाकरेंना सवाल
- Uddhav Thackeray | “भाजपच्या मेहरबानीवर एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री पद टिकून आहे”
- IND vs PAK | मेलबर्नमध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला, सामन्याच्या वेळेपासून ते प्लेइंग 11, जाणून घ्या प्रत्येक अपडेट
- BJP | “2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपचा पराभाव होणार”, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं भाकीत