IND vs Pak T20 World Cup : T20 विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना सुरु आहे. ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर दोन्ही संघ खेळत आहेत. भारत आणि पाकिस्तान संघांना विजयाने सुरुवात करायची आहे. गेल्या टी-२० विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला आहे. दरम्यान भारताने भेदक गोलंदाजीचा मारा करत पाकिस्तानवर दबाव निर्माण केला आहे. भारताने टॉस जिंकत प्रथम गोंलदाजीचा निर्णय घेतला.
अर्शदीप, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार अप्रतिम कामगिरी करत आहेत. पाकिस्तानी फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी दिली नाही. पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानने 2 बाद 32 धावा केल्या.
भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला ; इथं पाहा लाईव्ह स्कोर
अर्शदीपच्या गोलंदाजीने पाकिस्तान संघ चांगलाच हैराण झाला आहे. भारतीय गोलंदाजाने बाबर आझमला पहिल्याच विश्वचषकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले. यानंतर दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने रिझवानलाही आपला बळी बनवले. रिझवानला केवळ 4 धावा करता आल्या. 10 ओव्हरमध्ये पाकीस्तानने फक्त 60 धावा करता आल्या.
महत्वाच्या बातम्या :
- India vs Pakistan । सूर्यकुमार यादवबाबत पाकिस्तानच्या माजी खेळाडूच मोठं वक्तव्य, म्हणाला….
- Diwali 2022 | दिवाळी लक्ष्मीपूजनासाठी कोणत्या गोष्टी असतात आवश्यक, जाणून घ्या
- Abdul Sattar | ‘रस्त्यावर उतरू’ असा इशारा देणाऱ्या अंबादास दानवेंना अब्दुल सत्तारांनी दिलं प्रत्युत्तर म्हणाले..
- Ram Shinde | “चॉकलेटवर सगळेच…”, रोहित पवारांच्या टीकेला राम शिंदेंचा पलटवार
- Raju Patil । “मनसे भाजपा-शिंदे गटासोबत युती करणार का?”; राजू पाटील म्हणाले…