IND vs PAK : सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून हार्दिक पांड्या गायब; कोहलीच्या चिंतेत वाढ 

IND vs PAK : सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून हार्दिक पांड्या गायब; कोहलीच्या चिंतेत वाढ 

dhoni

दुबई : आज आयसीसी टी-२० विश्वचषक केवळ भारत आणि पाकिस्तानसाठीच नाही तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठीही खूप महत्त्वाचा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहते वाट पाहत आहेत. आता हा सामना सुरू होण्यास फक्त काही तास शिल्लक आहेत. भारतीय वेळेनुसार हा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी संध्याकाळी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी एक वैकल्पिक प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मार्गदर्शक महेंद्रसिंग धोनीसोबत बराच वेळ घालवला.

विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी या दरम्यान भरपूर फलंदाजीचा सराव केला आणि या महान सामन्यासाठी पूर्णपणे तयार दिसले. ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनीही फलंदाजीचा सराव केला, तर श्रेयस अय्यरही फलंदाजी करताना दिसला. अय्यर 15 सदस्यीय संघाचा भाग नाही आणि राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियाशी संबंधित आहे. या ऑप्शनल ट्रेनिंगमध्ये हार्दिक पांड्याशिवाय इशान किशनही दिसला नाही. यादरम्यान संघाचा मार्गदर्शक धोनीने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसोबत मैदानावर बराच वेळ घालवला.

हार्दिक पंड्याबद्दल सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत, हा अष्टपैलू अलीकडेच संपलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजी करू शकला नाही. हार्दिकला फक्त फलंदाज म्हणून संघात समाविष्ट करावे की नाही यावर बराच काळ चर्चा सुरू आहे. कर्णधार विराटने भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले की, हार्दिक हा टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. सामन्यात कोणत्याही टप्प्यावर तो दोन षटके टाकू शकतो, पण त्याची फलंदाजी संघासाठी मौल्यवान आहे, असेही विराट म्हणाला.

महत्वाच्या बातम्या