Share

IND VS PAK | भारताची खराब सुरवात! पहिल्या 7 ओव्हरमध्ये 4 खेळाडू तंबूत

IND VS PAK | T20 विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना सुरु आहे. ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर दोन्ही संघ सुमारे खेळत आहेत. भारत आणि पाकिस्तान संघांना विजयाने सुरुवात करायची आहे. गेल्या टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत आठ गडी गमावून 159 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारताची सरुवात निराशाजनक राहिली. पहिल्या 7 ओव्हरमध्ये भारताचे 4 खेळाडू तंबूत परतले.

नसीम शाहने भारतीय संघाला पहिला धक्का दिला आहे. केएल राहुल त्याच्या बॉलवर 4 धावा काढून बोल्ड झाला. त्यानंतर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. भारतीय संघाला दुसरा धक्का कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने बसला आहे. रोहित शर्माला इफ्तिखार अहमदने हारिस रौफच्या चेंडूवर स्लिपमध्ये झेलबाद केले. सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यानंतर त्याने 10 चेंडूत 15 धावा केल्या आणि मोहम्मद रिझवानकडे हरिस रौफकडे झेलबाद झाला. त्यानंतर अक्षर पटेल फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र तो फार काही करु शकला नाहीत. पटेल अवघ्या 2 धावा करून धावबाद झाला. आता हार्दिक पांड्या फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे.

अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने पाकिस्तानी फलंदाजी केली उद्ध्वस्त 

भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांनी पाकिस्तानच्या फलंदाजीला पूर्णपणे हादरा दिला आहे. सिंगने जहान ग्रीन संघाचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानसह तीन विकेट घेतल्या. त्याचबरोबर पंड्यानने पाकिस्तानच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.

इथं पाहा लाईव्ह स्कोर

महत्वाच्या बातम्या :

IND VS PAK | T20 विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना सुरु आहे. ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर दोन्ही …

पुढे वाचा

Cricket Marathi News Sports

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या