IND vs NED T20 World Cup | पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाचा उत्साह उंचावला असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज नेदरलँड्सला हरवण्यासाठी सज्ज झाला आहे. हा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. नेदरलँडचा संघ पहिला सामना हरला आहे. बांगलादेशने नेदरलँड्सचा 9 धावांनी पराभव केला. अशा स्थितीत हा सामना जिंकण्याचा नेदरलँडचा प्रयत्न असेल. मात्र, हा सामना त्यांच्यासाठी सोपा नसेल, कारण भारताकडे अनुभव आणि पाकिस्तानवर विजय मिळवल्याचा उत्साह आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता हा सामना सुरू होईल.
यापूर्वी टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध मेलबर्नमध्ये झाला होता. या सामन्यात विराट कोहलीच्या शानदार खेळीमुळे टीम इंडियाने 4 विकेट्सने विजय मिळवला होता. हा दुसरा सामना जरा दुबळ्या संघासोबत आहे. पण कर्णधार रोहित शर्माला मजबूत प्लेइंग-11 सोबत खेळायला आवडेल. प्लेइंग-11 मध्ये कोण प्लेअर असतील जाणून घेऊया.
भारत आणि नेदरलँड्सचा संभाव्य संघ-
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन/युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंह.
नेदरलँड संघ: मॅक्स ओ’डॉड, विक्रमजीत सिंग, बास डी लीडे, कॉलिन एकरमॅन, टॉम कूपर, स्कॉट एडवर्ड्स (सी/डब्ल्यू), टिम प्रिंगल, टिम वैन डर गुगेन, फ्रेड क्लासेन, पॉल वैन मीकरेन, शरीझ अहमद/रूलोफ वैन डर मर्व्ह.
कुठे पाहता येईल सामना-
भारत आणि नेदरलँड्स T20 विश्वचषक सुपर 12 सामने डीडी स्पोर्ट्सवर विनामूल्य पाहता येतील. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील T20 विश्वचषक सुपर 12 सामन्याचे थेट प्रक्षेपण (भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackeray | “…एवढं केलं तरी पुरेसं आहे”; आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा
- MNS | “राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर शिल्लक सेनेचे प्रमुख आणि छोटे नवाब…”; मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
- Shinde-Fadnavis | शिंदे-फडणवीस यांचा महाराष्ट्रात एकत्रित दौरा !
- Ramdas Kadam | “…तर अजित पवार नक्की मुख्यमंत्री झाले असते” रामदास कदमांनी केलं मोठं विधान
- Ramdas Kadam | “आदित्य ठाकरेंवर शेंबडं पोरगही…”; रामदास कदमांची बोचरी टीका