IND vs NED T20 World Cup | भारताने T20 विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. एकतर्फी झालेल्या सामन्यात भारताने नेदरलँडचा 56 धावांनी पराभव केला. भारतीय संघाने ICC विश्वचषक-2022 मध्ये शानदार सुरुवात केली आणि पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता. आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. या सामन्यात टीम इंडियाच्या अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने खास कामगिरी केली.
भुवनेश्वरने नेदरलँडविरुद्ध डावातील पहिले षटक आणि तिसरे षटक टाकले.भुवनेश्वरने ही दोन्ही षटके मेडन फेकली. यासह भुवनेश्वरने टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात पहिल्या दोन मेडन्स गोलंदाजी करणाऱ्या निवडक गोलंदाजांमध्ये आपले नाव कोरले. भुवनेश्वरपूर्वी हे काम इंग्लंडचा ऑफस्पिनर ग्रॅम स्वानने 2012 विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध केले होते. त्याच्यापाठोपाठ 2014 च्या विश्वचषकात श्रीलंकेच्या नुवान कुलसेकराने नेदरलँड्सविरुद्ध आणि रंगना हेराथने न्यूझीलंडविरुद्ध सुरुवातीच्या दोन मेडन्स गोलंदाजी केल्या. या तिघांनंतर भुवनेश्वरने यावेळी हे काम केले आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर भुवनेश्वरने भारतासाठी हे काम दुसऱ्यांदा केले आहे.
भारताचा खेळ-
आज टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. उपकर्णधार केएल राहुल तिसऱ्या षटकात केवळ 9 धावा काढून पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे पॅव्हेलियनमध्ये परतला. नेदरलँडच्या गोलंदाजांनी पहिल्या 6 षटकांत आपली पकड घट्ट केली आहे. पॉवरप्लेमध्ये भारताने 1 गडी गमावून 32 धावा केल्या होत्या. भारताने 9व्या षटकात 50 धावा पूर्ण केल्या. 10 षटकांत भारताने 1 गडी गमावून 67 धावा केल्या. रोहित आणि कोहली यांच्यातील अर्धशतकी भागीदारीही याच काळात पूर्ण झाली. रोहित शर्मानेही वेग पकडत 35 चेंडूत 29 वे अर्धशतक झळकावले, तो 53 धावा करून क्लासेनचा बळी ठरला. त्यानंतर कोहली आणि सूर्यकुमार यादवने धावसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले.
नेदरलँड्सचा खेळ-
भारताने दिलेल्या 180 धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्स संघ दबावात होता. 20 ओव्हरमध्ये 9 गड्यांच्या मोबदल्यात नेदरलँड्सला 124 धावा करता आल्या. भुवनेश्वर कुमारने पॉवरप्लेमध्ये आपली दोन्ही षटके मेडन केली आणि एक विकेटही घेतली. विक्रमजीत 9 चेंडूत एक धाव काढून बाद झाला. मॅक्स 10 चेंडूत 16 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. नेदरलँड्सने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. भारताकडून भुवनेश्वर, अर्शदीप, अक्षर पटेल, अश्विन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. या विजयासह, भारत 4 गुणांसह आणि +1.425 च्या रन रेटने गट II च्या शीर्षस्थानी पोहोचला आहे, जो गटात दक्षिण आफ्रिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Travel Guide | भारतातील ताजमहल सह ‘ही’ ठिकाणं आहेत परदेशी पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण
- IND vs NED । भारताचा नेदरलँड्सवर 56 धावांनी दणदणीत विजय
- Raosaheb Danave | “जरा आपल्या वयानुसार…”; रावसाहेब दानवेंचा आदित्य ठाकरेंवर हल्ला
- Ola Electric Bike | इलेक्ट्रिक स्कूटर आणि कारनंतर Ola लवकरच लाँच करणार आहे इलेक्ट्रिक बाईक
- Virat Kohli । नेदरलँड्स विरुद्ध खेळताना विराट कोहलीचा नवा विक्रम! ख्रिस गेलला टाकले मागे