IND vs NED T20 World Cup | T20 विश्वचषक 2022 चा 23 वा सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. यापूर्वी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. आज कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान आजच्या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने नेदरलँड्सला 180 धावांचे लक्ष दिले. रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके झळकावले.
भारताचा खेळ-
आज टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. उपकर्णधार केएल राहुल तिसऱ्या षटकात केवळ 9 धावा काढून पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे पॅव्हेलियनमध्ये परतला. नेदरलँडच्या गोलंदाजांनी पहिल्या 6 षटकांत आपली पकड घट्ट केली आहे. पॉवरप्लेमध्ये भारताने 1 गडी गमावून 32 धावा केल्या होत्या. भारताने 9व्या षटकात 50 धावा पूर्ण केल्या. 10 षटकांत भारताने 1 गडी गमावून 67 धावा केल्या. रोहित आणि कोहली यांच्यातील अर्धशतकी भागीदारीही याच काळात पूर्ण झाली. रोहित शर्मानेही वेग पकडत 35 चेंडूत 29 वे अर्धशतक झळकावले, तो 53 धावा करून क्लासेनचा बळी ठरला. त्यानंतर कोहली आणि सूर्यकुमार यादवने धावसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले.
सूर्यकुमार यादवने 95 धावांची भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. विराट कोहलीने 37 चेंडूत अर्धशतक ठोकले. तर डावाच्या शेवटच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने षटकार ठोकला आणि 25 चेंडूत 51 धावा केल्या. कोहली 62 धावांवर नाबाद राहिला. अशाप्रकारे भारताने 2 बाद 179 धावा केल्या. नेदरलँड्ससमोर आता 180 धावांचे लक्ष आहे.
विराट कोहलीचा नवा रेकॉर्ड-
विराट कोहली T20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ख्रिस गेलला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
केल राहुल बाद नव्हता-
वैन मीकरमनने सहाव्या षटकात केवळ चार धावा दिल्या. या षटकात चेंडूचा रिप्ले दाखवण्यात आला ज्यावर केएल राहुल बाद झाला. चेंडूकडे पाहिल्यावर मधल्या यष्टीला न आदळता चेंडू जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. राहुल यांनी DRS घ्यायला हवा होता. पण रोहित शर्माने नकार दिला. त्यामुळे स्वार्थी कर्णधार म्हणून रोहितवर सोशल मीडियावर टीका होत आहे.
जेव्हा-जेव्हा भारतीय संघाने विश्वचषकात नेदरलँड्सचा पराभव केला आहे, तेव्हा भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला आहे. 2011 मध्ये भारताने विजेतेपद आपल्या हातात घेतले होते, तर 2003 मध्ये ते उपविजेते होते.
महत्वाच्या बातम्या :
- Ravichandran Ashwin। मोहम्मद नवाजचा चेंडू वाईड गेला नसता, तर मी निवृत्ती घेतली असती, अश्विनचे धक्कादायक विधान
- IND vs NED T20 World Cup | केएल राहुल बाद नव्हता! रोहित स्वार्थी कर्णधार, सोशल मीडियावर टीका
- NTRO Job Alert | राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये NTRO विविध पदांसाठी बंपर भरती
- Eknath Khadase | “…तो मर्द कसला”, शहाजी पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन एकनाथ खडसेंची टोलेबाजी
- IND vs NED T20 World Cup | भारताला पहिला झटका! केएल राहुल बाद