मुंबई : भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यामध्ये एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. ज्याने हे पाहिले त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. भुवनेश्वर कुमार सर्वात वेगवान चेंडू टाकू शकतो, असे कोणी म्हटले तर त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. उमरान मलिकचे नाव समोर आल्यावर लोक हे नक्कीच स्वीकारतील, कारण वेग ही त्याची ताकद आहे. पण, भुवनेश्वर कुमारबाबत एक गोष्ट घडली, जी थक्क करणारी होती.
स्पीडोमीटरवर भुवनेश्वर कुमारच्या चेंडूचा वेग ताशी २०८ किमी मोजण्यात आला. आता जगातील सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम करणाऱ्या शोएब अख्तरने एवढा वेगवान चेंडूही फेकलेला नाही. भुवनेश्वरच्या या वेगवान चेंडूमागे स्पीडोमीटरमध्ये तांत्रिक बिघाड होता. भुवनेश्वर कुमारने सामन्याचे पहिले षटक टाकले होते आणि या षटकाच्या पहिल्या चेंडूचा वेग स्पीडोमीटरने २०१ किमी प्रति तास इतका दिला होता. त्याच षटकात स्पीडोमीटरने पुन्हा एकदा भुवनेश्वरच्या एका चेंडूचा वेग ताशी २०८ किमी सांगितला. जे शोएब अख्तरच्या १६१.३ किमी प्रतितास वेगापेक्षा जास्त होता. त्याने जागतिक क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू फेकला.
#BhuvneshwarKumar 227 kmh speed ball #INDvsIRE pic.twitter.com/WQc74eQUPD
— Muneer (@lts_muneer) June 27, 2022
In what seems to be a case of a shocking speed gun error, Bhuvneshwar Kumar clocked deliveries at 201 kmph & 208 kmph in 1st T20I against Ireland.
(📸Credit: BCCI/ICC)#INDvsIRE #HardikPandya #IREvsIND #TeamIndia #IrelandCricket #Cricket #t20series #BhuvneshwarKumar #UmranMalik pic.twitter.com/duIsnx6ICn
— SportsTiger (@sportstigerapp) June 26, 2022
भुवनेश्वर कुमार हा स्विंग गोलंदाज आहे. त्यांचा वेग १३० ते १४० किमी प्रतितास आहे. अशा स्थितीत आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात स्पीडोमीटरने त्याच्या चेंडूचा वेग ताशी २०० किमी वेगाने दाखवणे हा केवळ तांत्रिक दोष आहे. मात्र, या गडबडीने भारतीय चाहत्यांना धक्का बसला. यानंतर ट्विटरवर मीम्सचा महापूर आला.
महत्त्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<