मुंबई : टीम इंडियाने दुसऱ्या टी-२० सामन्यात आयर्लंडचा (IND vs IRE) पराभव करत दोन सामन्यांची टी-२० मालिका जिंकली आहे. हार्दिक पंड्याने कर्णधार म्हणून पहिली मालिका जिंकली. या मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात अनेक नवीन विक्रम झाले. दीपक हुडा आणि संजू सॅमसन भारताच्या विजयाचे हिरो ठरले. भारताकडून दोन्ही फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. हुडाने १०४ धावांची खेळी करत भारतासाठी पहिले टी-२० शतक झळकावले. त्याचवेळी संजू सॅमसननेही ७७ धावांची आक्रमक खेळी केली.
दीपक हुडा आणि संजू सॅमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १७६ धावांची विक्रमी भागीदारी केली. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी आहे. यापूर्वी हा विक्रम केएल राहुल आणि रोहित शर्माच्या नावावर होता. राहुल आणि रोहितने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध १६५ धावांची भागीदारी केली होती. हुडा आणि सॅमसन यांच्यातील ही भागीदारी टी-२० क्रिकेटमधील नववी सर्वात मोठी भागीदारी आहे. हुडाने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ४ षटकार मारले. फलंदाजीदरम्यान हुडाने फ्रंट फूट आणि बॅकफूटवर अनेक शानदार फटके मारले.
Deepak Hooda and Sanju Samson claim the #1 spot 👏#IREvIND pic.twitter.com/l3nF8lsWQE
— ICC (@ICC) June 29, 2022
भारताने आयर्लंडविरुद्ध २२५ धावा केल्या होत्या. आयर्लंडविरुद्धची ही आतापर्यंतची दुसरी सर्वोच्च टी-२० धावसंख्या आहे. यापूर्वी स्कॉटलंडने आयर्लंडविरुद्ध २५२ धावा केल्या होत्या. भारताच्या २२५ धावांच्या प्रत्युत्तरात आयर्लंडनेही वेगवान सुरुवात करत धावांचा पाठलाग करताना भारताला कडवी टक्कर दिली. एका क्षणी सामना भारताच्या हातातून निसटत असल्याचे दिसत होते. अखेर भारताने हा सामना ४ धावांच्या फरकाने जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<