Share

IND vs ENG T20 WC | भारताला दुसरा झटका, रोहित शर्मा झेलबाद! ‘सुर-विर’ची जोडी मैदानावर

IND vs ENG T20 WC | T20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि इंग्लंड संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमधील हा रोमांचक सामना अॅडलेड ओव्हलवर खेळला जात आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल तो 13 नोव्हेंबरला पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना खेळेल. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ओपनिंगसाठी केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी मैदानात आले आहे. केएल राहुल 5 धावांवर बाद झाला. ख्रिस वोक्सच्या चेंडूवर केएल राहुलने त्याचा झेल जोस बटलरकडे सोपवला.

रोहित शर्मा 27 धावांवर झेलबाद-

केएल राहुलच्या विकेटनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली जोरदार पलटवार करत आहेत. पॉवरप्लेमध्ये भारताची धावसंख्या एका विकेटच्या बदल्यात 38 झाली आहे. मात्र 56 धावांवर भारताची दुसरी विकेट पडली. रोहित शर्मा 27 धावांवर झेलबाद झाला. त्याच्या जाग्यावर सुर्यकूमार यादव मैदानावर आला आहे. आज मोठ्या धमाक्याची भारताला गरज आहे. इंग्लंडसमोर मोठे आव्हान भारताला द्यावे लागेल. विराट-रोहितकडून भारताला मोठी अपेक्षा आहे.

अ‍ॅडलेडवरील इतिहास-

अ‍ॅडलेडमध्ये आतापर्यंत एकूण 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने अधिक सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, नंतर गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी विजयाची टक्केवारी कमी आहे. एकूण सात सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला चार सामन्यांत विजय मिळाला आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

भारताचा खेळ-11: केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग

इंग्लंड प्लेइंग-11: जोस बटलर, अॅलेक्स हेल्स, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद

महत्वाच्या बातम्या : 

IND vs ENG T20 WC | T20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि इंग्लंड संघ आमनेसामने आहेत. दोन्ही …

पुढे वाचा

Cricket Marathi News Sports

Join WhatsApp

Join Now