IND vs ENG T20 WC | काय खेळलास भावा…! हार्दिक पांड्याची आश्चर्यकारक कामगिरी

IND vs ENG T20 WC | T20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि इंग्लंड संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमधील हा रोमांचक सामना अॅडलेड ओव्हलवर खेळला जात आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल तो 13 नोव्हेंबरला पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना खेळेल. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने इंग्लंडला 169 धावांचे लक्ष दिले. विराट आणि पांड्याने तुफानी खेळी केली. पांड्याची बॅट अशावेळी चमकली जेव्हा भारताला धावांची जास्त गरज होती.

हार्दिक पांड्याची आश्चर्यकारक कामगिरी-

हार्दिक पांड्याने उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. भारतीय संघ अडचणीत असताना हार्दिकने येथे शानदार फलंदाजी करत अवघ्या 33 चेंडूत 63 धावा केल्या. यादरम्यान हार्दिक पांड्याने 4 चौकार आणि 5 षटकार मारले. हार्दिकची खेळी नसती तर कदाचित या सामन्यात भारताला खूप संघर्ष करावा लागला असता.

हार्दिक पांड्याच्या या खेळीमुळे भारताने 20 षटकात 168 धावा केल्या आहेत. या डावात टीम इंडियाने एकूण 6 विकेट्स गमावल्या. भारताकडून हार्दिक पंड्या 63 आणि विराट कोहलीने सर्वाधिक 50 धावा केल्या.

विराट कोहलीचा मोठा विक्रम-

विराट कोहलीचा जबरदस्त फॉर्म कायम असून सेमीफायनलमध्येही त्याने टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले आहे. विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध आपले अर्धशतक पूर्ण केले असून टी-20 क्रिकेटमधील हे त्याचे 37 वे अर्धशतक आहे. विराट कोहलीने या डावात एक मोठा विक्रम केला आहे आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या आहेत, असे करणारा तो पहिला क्रिकेटर आहे.

महत्वाच्या बातम्या : 

IND vs ENG T20 WC | T20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि इंग्लंड संघ आमनेसामने आहेत. दोन्ही …

पुढे वाचा

Cricket Marathi News Sports