मुंबई : भारतीय संघ १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG) कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया लीसेस्टरशायरला पोहोचली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हा कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात गेल्या वर्षी झालेल्या कसोटी मालिकेचा भाग आहे. या मालिकेत भारताकडे २-१अशी अभेद्य आघाडी आहे. अशा परिस्थितीत इंग्लंडने हा कसोटी सामना जिंकल्यास मालिका बरोबरीत संपेल.
मात्र, या एका वर्षात भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघात बरेच बदल झाले आहेत. दोन्ही संघांचे कर्णधार बदलले आहेत. भारताचे नेतृत्व कोहलीच्या ऐवजी रोहितच्या हातात असून इंग्लंडचे नेतृत्व जो रूटच्या जागी बेन स्टोक्सकडे आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघ नव्या कर्णधारांसह कशी कामगिरी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफने या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल सांगितले. कैफने सांगितले की, भारत या सामन्यात चार वेगवान गोलंदाज, एक फिरकी गोलंदाज आणि सहा फलंदाजांसह उतरू शकतो. कैफच्या मते या सामन्यात उमेश यादवला संधी मिळणार असून तो संघाचा चौथा गोलंदाज असेल.
मोहम्मद कैफची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), हनुमा विहारी, जडेजा/अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह.
महत्त्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<