मुंबई : स्फोटक सलामीवीर जोस बटलरला इंग्लंड संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. अलीकडेच इऑन मॉर्गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. अशा परिस्थितीत टी-२० आणि वनडे कर्णधाराची जागा रिक्त होती. आता बटलरकडे ही जबाबदारी आली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० आणि एकदिवसीय मालिका (IND vs ENG) ७ जुलैपासून सुरू होत आहे. बटलर टीम इंडियाविरुद्धच कर्णधारपदाची सुरुवात करेल. याआधी १ जुलैपासून होणाऱ्या कसोटीसाठी जसप्रीत बुमराहला भारतीय संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. तो प्रथमच संघाचे नेतृत्व करत आहे. कसोटी मालिकेत टीम इंडिया २-१ ने पुढे आहे.
BREAKING: Jos Buttler has been appointed England men's new white-ball captain 🏴 pic.twitter.com/RG1RQkZgi6
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 30, 2022
जोस बटलरचा टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमधील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. यापूर्वी त्याने आयपीएल २०२२मध्ये ४ शतकांच्या मदतीने ८५० हून अधिक धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो इंग्लंडचा दुसरा पुरुष खेळाडू आहे. त्याच्याशिवाय केवळ डेव्हिड मलान हेच करू शकले आहेत. त्याने इंग्लंडकडून ८८ टी-२० आणि १५१ एकदिवसीय सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<