मुंबई : एजबॅस्टन कसोटीच्या (IND vs ENG) दोन दिवस आधी मोठी बातमी समोर आली आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारतीय संघाला मोठा धक्का बसू शकतो. रोहित शर्मा एजबॅस्टन कसोटीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी जसप्रीत बुमराह त्या कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. बुमराहला ही माहिती देण्यात आली आहे.
लीस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली. तो अजूनही पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. अशा परिस्थितीत टीम इंडिया नवा कर्णधार बुमराहच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरू शकते. संघाच्या बैठकीत बुमराहला कर्णधारपदाची माहिती देण्यात आली आहे.
३५ वर्षीय बुमराह कपिल देवनंतर टीम इंडियाचा कर्णधार करणारा दुसरा वेगवान गोलंदाज ठरणार आहे. मार्च १९८७ मध्ये कपिल देव यांच्यानंतर कोणत्याही वेगवान गोलंदाजाने भारताचे नेतृत्व केलेले नाही. या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेतील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेदरम्यान बुमराहला भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून बढती देण्यात आली होती. त्यानंतर पत्रकार परिषदेत बुमराहने संधी मिळाल्यास भारताचे कर्णधारपद स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगितले होते.
⚡ THE LEADER! Jasprit Bumrah has been named the captain for the fifth Test. He's been the leading wicket-taker for us in this series.
👊 Lead us to glory, Boom Boom!
📸 Getty • #INDvENG #ENGvIND #JaspritBumrah #TeamIndia #BharatArmy pic.twitter.com/8qXPxY0Y4q
— The Bharat Army (@thebharatarmy) June 29, 2022
बुमराहशिवाय अन्य दोन खेळाडूंची नावे कर्णधारपदासाठी समोर आली होती. यामध्ये ऋषभ पंत आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. पंतने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व केले. या मालिकेतील पहिले चार सामने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळले गेले.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर विराट कोहलीने यावर्षी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता बुमराह इंग्लंडविरुद्ध कर्णधारपद भूषवताना दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. गेल्या वर्षी, भारतीय संघात कोरोनाची अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना पुढे ढकलण्यात आला आणि त्याचे वेळापत्रक बदलण्यात आले. आता खेळला जाणारा हा पाचवा कसोटी सामना आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<