मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन कसोटी (IND vs ENG) शुक्रवारपासून सुरू होणार आहे. गेल्या वर्षीच्या इंग्लंड दौऱ्यातील ही पाचवी कसोटी आहे, जी कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. या सामन्यापूर्वी प्रशिक्षणादरम्यान भारतीय खेळाडूंनी धावणे, क्षेत्ररक्षण, फलंदाजी आणि गोलंदाजी या सर्व विभागात सराव केला. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने आपल्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये म्हटले, ”ऐतिहासिक कसोटीसाठी भारतीय संघ मेहनत घेत आहे. प्रशिक्षण सत्राची एक झलक तुम्हाला दाखवण्यासाठी आमच्याकडे संजना गणेशन आहेत.”
या मालिकेत भारतीय संघ २-१ ने पुढे आहे. मालिका वाचवण्यासाठी इंग्लंडला एजबॅस्टन कसोटी कोणत्याही किंमतीत जिंकावी लागणार आहे. एजबॅस्टन कसोटीपूर्वी संघाचा कप्तान रोहित शर्माला कोरोना झाला. तेव्हापासून तो आयसोलेशनमध्ये आहे. बुधवारी त्याची चाचणी करण्यात आली, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दरम्यान, भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनेही पत्रकार परिषदेत रोहित शर्माबाबत मोठा खुलासा केला. रोहित या कसोटीतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही आणि वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. रोहित शर्माच्या आणखी काही कोविड चाचण्या होणार आहे. या कसोटीपूर्वी इंग्लंड संघाने आपली प्लेइंग इलेव्हन घोषित केली आहे.
पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन –
अॅलेक्स लीस, जॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), सॅम बिलिंग्ज, मॅथ्यू पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन
महत्त्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<