मुंबई : १ जुलै पासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स ज्या ११ खेळाडूंसोबत खेळणार आहे, त्यांची नावे समोर आली आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने गुरुवारी याची घोषणा केली. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात खेळलेल्या संघात एक बदल करण्यात आला आहे. दुखापतीमुळे शेवटची कसोटी न खेळलेला वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचे पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंड मालिकेतच त्याने कसोटी कारकिर्दीत ६५० बळी पूर्ण केले होते. इंग्लड आणि भारत यांच्यामधील गेल्या वर्षी कोरोनामुळे पाचवी कसोटी खेळता आली नाही. तो पूर्वनियोजित असलेला कसोटी सामना एक जुलैपासून या दोन्ही संघांमध्ये खेळला जाणार आहे. भारत सध्या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. इंग्लंड विरुद्धच्या या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरू शकतो.
इंग्लंड संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघासमोर कडवे आव्हान असणार आहे. अलीकडेच इंग्लंडने घरच्या मैदानावर ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा ३-० असा पराभव केला आहे. दुसरीकडे, भारतीय संघ अडचणींशी झुंजताना दिसत आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला कोरोनामुळे या सामन्यात खेळणे शक्य नाही. तसेच स्टार फलंदाज केएल राहुल आधीच दुखापतीमुळे या दौऱ्यातून बाहेर आहे. अशा परिस्थितीत विराट कोहलीवर मोठी जबाबदारी असणार आहे.
रूट आणि बेअरस्टो फॉर्ममध्ये
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी चमकदार कामगिरी केली. या मालिकेत दोघांनी २-२ शतके झळकावत आपल्या फलंदाजीची छाप सोडली. याशिवाय ओली पोपनेही शतक झळकावले आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेत बेअरस्टोने ३९४ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १२० असा राहिला आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा माजी कर्णधार रूटने या मालिकेत सर्वाधिक ३९६ धावा केल्या आहेत. पोपनेही अडीचशेहून अधिक धावा करून संघाला मलिका विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
Our XI for the fifth LV= Insurance Test with @BCCI 🏏
More here: https://t.co/uXHG3iOVCA
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/xZlULGsNiB
— England Cricket (@englandcricket) June 30, 2022
इंग्लंड संभाव्य प्लेइंग इलेव्हन
इंग्लंड – अॅलेक्स लीस, जॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), सॅम बिलिंग्ज, मॅथ्यू पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<