IND vs BAN T20 | टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरली आहे. अॅडलेड ओव्हल मैदानावर शकीब अल हसनने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताने केएल राहुल आणि विराटच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर बांगलादेशला १८५ धावांचे लक्ष दिले. विराट कोहली ४४ चेंडूत ६४ धावा करून नाबाद राहिला. ८ चौकार आणि एक षटकार. त्यामुळे प्रथम खेळताना भारताने ६ गड्यांच्या मोबदल्यात १८४ धावा केल्या आहेत. अश्विनने शेवटच्या षटकात एक षटकार आणि एक चौकार लगावला. तो ६ चेंडूत १३ धावा करून नाबाद राहिला. भारताने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना. बांगलादेशने६ ओव्हरमध्ये ६६ धावा केल्या. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला होता. दरम्यान पावसानंतर पुन्हा खेळ सुरू झाला, आता बांगलादेशला डकवर्थ नियमानुसार ५४ चेंडूत ८५ धावा करायच्या आहेत.
भारताचा डाव –
भारतीय कर्णधार रोहित शर्मा केवळ दोन धावांवर हसन महमूदच्या खासगी धावसंख्येवर झेलबाद झाला. यावेळी विराट कोहली आणि केएल राहुलने चांगली भागिदारी केली. केएल राहुचा फॉर्म पुन्हा वापस आला आहे. आजच्या सामन्यात त्याने अर्धशतक ठोकले. केएल राहुलने स्पर्धेतील पहिले अर्धशतक ३१ चेंडूत पूर्ण केले. यामध्ये त्याने ३ चौकार आणि ४ षटकार मारले. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. शाकिब अल हसनने केएल राहुलची विकेट घेतली. केएल राहुल पूर्वी रोहित शर्मा सस्त्यात आऊट झाला होता. रोहितने 8 चेंडूत केवळ दोन धावा केल्या.
केएल राहुलनंतर कर्णधार शकीब अल हसनने सूर्यकुमारचा डाव संपवला. सूर्याने १६ चेंडूत ३० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. भारताला तिसरा धक्का बसला. त्यानंतर हार्दिक पांड्या देखील बाद झाला. हसन महमूदने १६व्या षटकात हार्दिक पांड्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने पॉइंटवर चेंडू खेळला, यासिर अलीने येथे एक सोपा झेल घेतला. भारताला चौथा धक्का बसला. हार्दिकनंतर कार्तिक १४व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला. कार्तिकला ५ चेंडूत केवळ सात धावा करता आल्या. त्यानंतर अक्षर पटेल देखील धावबाद झाला.
भारताने संघात केला मोठा बदल-
भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांनी आपापल्या संघात एक बदल केला आहे. जिथे भारताने दीपक हुडाला बाहेर ठेवत अक्षर पटेलला संधी दिली आहे. त्याचबरोबर बांगलादेश संघात सौम्या सरकारच्या जागी शरीफुल इस्लामचा समावेश करण्यात आला आहे.
बांगलादेशची प्लेइंग -11
नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, शाकिब अल हसन, अफिफ हुसैन, नुरुल हसन, मोसाद्देक हुसेन, यासिर अली, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शरीफुल इस्लाम.
इंडियाची प्लेइंग -11
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, दिनेश कार्तिक, आर अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह
महत्वाच्या बातम्या :
- Abdul Sattar | “आदित्य ठाकरे २ नंबरचे पप्पू” ; अब्दुल सत्तार यांची टीका
- Arvind Sawant | महाराष्ट्रातील जनता निवडणूक कधी लागणार याची वाट बघत आहेत – अरविंद सावंत
- Atul Londhe | रोजगार आणला तर विरोधी पक्ष सुद्धा देवेंद्र फडणवीसांसोबत राहिल – अतुल लोंढे
- Balasaheb Thorat | राज्यातील भारत जोडो यात्रेसंदर्भात बाळासाहेब थोरात यांची माहिती
- Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली स्वतःच्या शेताची पाहणी