Share

IND vs BAN T20 | जबरदस्त अर्धशतक झळकावल्यानंतर केएल राहुल बाद ; भारताला बसला दुसरा धक्का

IND vs BAN T20 | टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरली आहे. अॅडलेड ओव्हल मैदानावर शकीब अल हसनने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा केवळ दोन धावांवर हसन महमूदच्या खासगी धावसंख्येवर झेलबाद झाला. यावेळी विराट कोहली आणि केएल राहुलने चांगली भागिदारी केली. केएल राहुचा फॉर्म पुन्हा वापस आला आहे. आजच्या सामन्यात त्याने अर्धशतक ठोकले. केएल राहुलने स्पर्धेतील पहिले अर्धशतक 31 चेंडूत पूर्ण केले. यामध्ये त्याने ३ चौकार आणि ४ षटकार मारले. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. शाकिब अल हसनने त्याची विकेट घेतली.

केएल राहुल पूर्वी रोहित शर्मा सस्त्यात आऊट झाला आहे. तस्किन अहमदच्या षटकात रोहित शर्माला जीवदान मिळाले होते. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर राहुलने डीप बॅकवर्ड लेगवर चेंडू खेळला, सीमारेषेवर उभ्या असलेल्या हसनला संधी होती पण त्याने सोपा झेल सोडला. या षटकातही एकच धाव आली. त्यानंतर हसन महमूदने आपली चूक सुधारत रोहित शर्माला बाद केले. चौथ्या षटकाला आलेल्या महमूदने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहितने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण स्लिपमध्ये यासिर अलीकडे झेलबाद झाला. रोहितने 8 चेंडूत केवळ दोन धावा केल्या.

भारताने संघात केला मोठा बदल-

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांनी आपापल्या संघात एक बदल केला आहे. जिथे भारताने दीपक हुडाला बाहेर ठेवत अक्षर पटेलला संधी दिली आहे. त्याचबरोबर बांगलादेश संघात सौम्या सरकारच्या जागी शरीफुल इस्लामचा समावेश करण्यात आला आहे.

बांगलादेशची प्लेइंग -11

नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, शाकिब अल हसन, अफिफ हुसैन, नुरुल हसन, मोसाद्देक हुसेन, यासिर अली, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शरीफुल इस्लाम.

इंडियाची प्लेइंग -11

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, दिनेश कार्तिक, आर अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह

महत्वाच्या बातम्या : 

IND vs BAN T20 | टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरली आहे. अॅडलेड ओव्हल मैदानावर शकीब अल हसनने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम …

पुढे वाचा

Cricket Marathi News Sports