Share

IND vs BAN | कुलदीपच्या कामगिरीने प्रशिक्षक झाले प्रभावित, म्हणाले…

IND vs BAN | टीम महाराष्ट्र देशा: बांगलादेशविरुद्ध (IND vs BAN) सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कुलदीप यादवने बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 40 धावांचे योगदान दिले . त्याच्या या धावांनंतर भारतीय संघाची धावसंख्या 400 च्या जवळ पोहोचली होती. त्याचबरोबर त्याने आत्तापर्यंत स्फोटक गोलंदाजी करत महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीनंतर त्याचे प्रशिक्षक कपिल पांडे (Kapil Pandey) यांनी त्याच्यावर भाष्य केले आहे.

प्रशिक्षक कपिल पांडे म्हणाले की,”कुलदीप यादव हा एक योद्धा आहे. त्याला संधी मिळाल्यावर तो देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करू शकतो. कुलदीप हा एक असा फायटर आहे, ज्याची विकेट्स घेण्याची भूक कधीच संपणार नाही. गेले 18 महिने तो भारतीय संघापासून दूर आहे. त्याने आज आपल्या गोलंदाजीने दाखवून दिले की, जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा तो विकेट घेईल. कसोटी सामन्यामध्ये त्याची विकेट घेण्याची सरासरी चार आहे. तर त्याच्या गोलंदाजी मध्ये अजूनही बरीच ताकद आहे.”

कुलदीप यादवच्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आत्तापर्यंत फक्त आठ कसोटी सामने खेळले असतील. यामध्ये त्याने  आत्तापर्यंत 13 डावांमध्ये 30 बळी घेतलेले आहेत. त्याबरोबरच त्याने दोन वेळा पाच विकेट घेतल्या आहेत. यावर बोलताना प्रशिक्षक कपिल पांडे म्हणाले की,”ऑस्ट्रेलिया विरुद्ध कुलदीपने एका डावात पाच विकेट घेतल्या होत्या. तर त्याआधी त्याने इंग्लंड विरुद्ध देखील उत्कृष्ट कामगिरी केली होती. तरी त्याला भारतीय संघात संधी मिळाली नव्हती.”

पुढे बोलताना कपिल पांडे म्हणाले की, “कुलदीप भारतीय संघापासून दूर होता, पण त्याने त्याच्या सरावात कुठलीही कमतरता येऊ दिली नाही. तर, आयपीएलमध्ये कोलकत्ता नाईट रायडरचा भाग नसल्यामुळे कुलदीप थोडा निराश झाला होता. पण सकारात्मक मानसिकता ठेवून तो सतत सराव करत राहिला. परिणामी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना कुलदीपने शानदार कामगिरी केली.”

महत्वाच्या बातम्या

IND vs BAN | टीम महाराष्ट्र देशा: बांगलादेशविरुद्ध (IND vs BAN) सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू …

पुढे वाचा

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now