ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या सामन्याआधीच धक्का

steve-smith

टीम महाराष्ट्र देशा :ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या सामन्याआधीच धक्का बसला आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथ जखमी झाला असल्याने टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. खांद्याला दुखापत झाली असल्याने स्टीव्ह स्मिथ बाहेर पडला असून ऑस्ट्रेलियाला परतला आहे. स्टीव्ह स्मिथच्या जागी ऑल-राऊंडर मार्कस स्टोनिसला संघात जागा देण्यात आली आहे.

टी-२० मालिकेतील पहिला सामना आज रांचीच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी सराव करत असताना स्मिथच्या खांद्याला दुखापत झाली होती. दुखापतीनंतर स्मिथला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची एमआरआय तपासणीनी केल्यानंतर तो मैदानात उतरण्यास सज्ज होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी स्मिथ सराव करताना दिसला नाही. आगामी अॅशेस मालिकेचा विचार करुन ऑस्ट्रेलिया बोर्डाने त्याला मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २३ नोव्हेंबरपासून अॅशस मालिका रंगणार आहे.

स्मिथच्या अनुपस्थितीत सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलिया संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. टी-२० मालिकेत भारताचे आव्हान परतवण्यासाठी त्याला फलंदाजीसह कर्णधारपदाची जबाबदारीही सांभाळावी लागणार आहे. दुसरीकडे यष्टीरक्षक पेनला सलामीवीराची भूमिका पार पाडावी लागू शकते.