fbpx

ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी,पावसाच्या व्यत्ययामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला

सिडनी : पावसाच्या व्यत्ययामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला आहे. तोपर्यंत ऑस्ट्रेलियाचा स्कोअर २३६- ६ एवढा होता. ऑस्ट्रेलियासाठी दुसरा दिवस आतापर्यंत फारसा चांगला गेला नाही. कुलदीप यादवने आतापर्यंत तीन गडी बाद केले तर रवींद्र जडेजाने दोन आणि मोहम्मद शमीने एक गडी बाद केला.

दरम्यान, चेतेश्वर पुजारापाठोपाठ यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याच्या मोठ्या धडाक्यामुळे भारताने चौथ्या आणि अखेरच्या कसोटीच्या पहिल्या डावात 7 बाद 622 असा डोंगर उभारला आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघाने सावध पवित्रा घेत बिनबाद 24 धावांची वाटचाल केली. आज ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्याने ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी सुरूच राहिली. मार्कस हॅरिसने सर्वात जास्त ७९, लबुशान ३८ आणि हेडने २० धावा केल्या. कमिन्स २५ आणि हँड्सकॉम्ब २८ धावा करुन मैदानावर टिकून आहेत.

दरम्यान,आजचा उरलेला दिवस भरुन काढण्यासाठी पुढचे दोन दिवस सामना अर्धा तास लवकर सुरू करण्यात येईल. उद्या आणि परवा सामना पहाटे ४.३० वाजता सुरू होईल. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारताने 2-1अशी आघाडी संपादन केली आहे.

1 Comment

Click here to post a comment