fbpx

Ind vs aus : किंग कोहलीची सेंच्युरी,मास्टर ब्लास्टरचा ‘हा’ मोठा विक्रम काढला मोडीत

टीम महाराष्ट्र देशा- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा मंगळवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने  ५००वा विजय मिळवला.या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने १०७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील ४० वे शतक ठरले.

या शतकाबरोबरच त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडीत काढला . विराटने ४० शतके ठोकण्यासाठी केवळ २१६ डाव खेळले. तर सचिनला ४० शतके लगावण्यासाठी ३५५ डाव खेळावे लागले होते. ४० शतकांचा टप्पा गाठण्यासाठी त्याने सचिनपेक्षा तब्बल १३९ डाव कमी घेतले.