IND vs AUS | BCCI ने बदललं कसोटीचं ठिकाणं, ‘या’ शहरामध्ये होणार तिसरा सामना

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे पार पडला आहे. पहिला कसोटी सामना जिंकून टीम इंडियाने या मालिकेमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना धर्मशाळा येथून हलवण्यात येणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. बीसीसआयने अखेर या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना धर्मशाळा ऐवजी इंदोर येथे होणार आहे. धर्मशाळा स्टेडियमचे नूतनीकरणाचे काम अपूर्ण असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. हा कसोटी सामना पुण्यात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता हा सामना इंदोरमध्ये खेळला जाणार आहे.

पहिल्या कसोटी सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियन संघाला महागात पडला. कारण टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन संघ 63.5 षटकांमध्ये गुंडाळले होते. टीम इंडियाने  ऑस्ट्रेलियाला 177 धावांमध्ये बाद केले. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या एकाही खेळाडूला अर्धशतक करता आले नव्हते.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. हा सामना 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर तिसरा कसोटी सामना इंदोर येथे खेळला जाणार आहे. तर या मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Exit mobile version