शिक्षणमंत्र्याचं वाढत ‘मोदी प्रेम’ अडचणीत येण्याची शक्यता

ashok chvhan vr vinod tawade

टीम महाराष्ट्र देशा: जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सरदार पटेल अशा थोर नेत्यांना वगळून पंतप्रधानांवरील पुस्तकांची सर्वाधिक मागणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची श्यक्यता आहे. नरेंद्र मोदी या नावाचं हे पुस्तक २४ पानांचं असून त्यात नरेंद्र मोदी यांचा चहा विक्रेता ते पंतप्रधान हा प्रवास देण्यात आला आहे. या पुस्तकांच्या दीड लाख प्रतींची किंमत सुमारे ५९. ४२ लाख रुपये इतकी आहे. हिंदी, मराठी, गुजराती आणि इंग्रजी अशा चार भाषांमध्ये ही पुस्तकं छापलेली असून जिल्हा परिषदांच्या शाळांच्या वाचनालयांमध्ये यांचा समावेश होणार आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजप नेत्यांनी इतिहासाच्या पानातून महापुरुषांची नावे पुसण्याचा उद्योग चालविला आहे. अशी टीका केली आहे. पंडीत जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात संघर्ष होता असे खोटे चित्र जाणिवपूर्वक उभे करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे.

महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने महात्मा गांधी, महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र कमीत कमी लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने त्यावरील खर्च कमी केला आहे. असेही चव्हाण म्हणाले, दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या पुस्तकांवर शिक्षण विभागाने मराठी भाषेतील ७२ हजार ९३३ प्रती, इंग्रजीतील ७१४८, गुजरातीत ३३ आणि हिंदीतील ४२५ प्रती खरेदी केल्या आहेत. मात्र, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुस्तक खरेदीसाठी केवळ तीन लाख २५ हजार रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग अडचणीत येण्याची चिन्ह आहेत.