कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेवून अरविंद केजरीवाल सरकारने उचलली ‘ही’ पावलं

corona

नवी दिल्ली : करोना संक्रमणाचा देशभर होणारा फैलाव चिंतेत अधिक भर टाकतोय. आज सकाळी समोर आलेली करोनाची आकडेवारी धोक्याची घंटा ठरतेय. देशात गेल्या २४ तासांत १ लाख १५ हजारांच्या घरात नवीन करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेवून अनेक राज्यात कठोर पावले उचलली जात आहेत.गेल्या 24 तासात दिल्लीत पाच हजार 100 नवे कोरोनाबाधित आढळले. यासह दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या सहा लाख 85 हजार झाली आहे. त्यापैकी सहा लाख 56 हजार कोरोनाबाधित बरे झाले असून काल दिवसभरात 2हजार 340 जण बरे झाले तर सतरा जणांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला.

कोरोनाग्रस्तांची संख्या सतत वाढत असल्याने राजधानी दिल्लीत येत्या 30 एप्रिल पर्यंत रात्री दहा वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत.

खाजगी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. फळं भाजी विक्रेते, किराणा दुकानदार, औषध विक्रेते, माध्यम कर्मचाऱ्यांना इ पास बाळगावा लागेल.

महत्वाच्या बातम्या