आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव! दिल्ली स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफचे ५ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : राज्य आणि भारतात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या सावटाखाली भारतात आयपीएल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडला. मात्र स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र कोरोनाने आयपीएलला गाठले.

सोमवारी ३ मे रोजी आयपीएलमध्ये कोरोनाच्या बाधीतांची संख्या वाढतच चालली आहे. केकेआर आणि चेन्नई संघाच्या सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. रविवारी झालेल्या दिल्ली येथील सामन्यातील मैदानातील ग्राउंड स्टाफच्या ५ कर्मचाऱ्यांचा कोरोनाची लागण झाली आहे. या अहवालानंतर त्याना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामुळे या मैदानावर होणारा पुढचा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संकटात सापडला आहे.

या मैदानावर ८ मे रोजी शेवटचा सामना होणार आहे. ही बातमी समोर येण्याच्या काही तास आधीच चेन्नई सुपर किंग्स संघाचे सीईओ कासी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बस क्लिनर यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला. कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर हे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स आणि आरसीबी संघातील सोमवार ३ मेचा सामना पुढे ढकलण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या