अहमदनगर : शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय बदलण्याचे काम केल्याचे दिसून येते. जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय विद्यमान सरकारने घेतला पण तो घेण्याआधी त्याचे फलित काय? हे तपासणे आवश्यक आहे.
हा निर्णय जेव्हा पूर्वी झाला तेव्हा नगरपालिका किंवा ग्रामपंचायत व्यवस्थित चालते का? हे जर त्यांनी तपासले असते तर हा निर्णय घेताना त्यांनी चारदा विचार केला असता, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. संगमनेर येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाचा समाचार घेतला आहे. पेट्रोल वरचे दर कमी केले हे जरी खरं असलं तरी दुसऱ्या बाजूने विजेचे दर मात्र 20 टक्क्याने वाढवले आणि हे सांगायला ते जाणीवपूर्वक विसरले. एका बाजूने दिलासा द्यायचा आणि दुसऱ्या बाजूने जाणीवपूर्वक लोकांच्या खिशातून पैसा काढून घ्यायचा असा हा सगळा प्रकार दिसतो.
महत्वाच्या बातम्या :
- Raj Thackeray Meeting : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात बैठक! राजकीय चर्चांना उधाण
- Deepak Kesarkar : “माझ्या जडणघडणीमध्ये शरद पवारांचा मोठा वाटा”; केसरकरांनी व्यक्त केली दिलगिरी
- Atul Londhe | पेट्रोल व डिझेलचे दर कपात करण्याच्या निर्णयानंतर अतूल लोंढे यांची प्रतिक्रिया
- Mahesh Tapase : इंधन दर कपातीचे श्रेय अजित पवार यांचे – महेश तपासे
- Jayant Patil । “१५ दिवस झाले तरी यांना सरकार स्थापन करता आले नाही”; जयंत पाटील यांचा टोला
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<