‘भीमा कोरेगाव’ प्रकरणानंतर आठवलेंवर वाढती नाराजी; अनेक पदाधिकाऱ्याचे राजीनामे

आठवले

बार्शी: भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारानंतर आंबेडकरवादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसत आहे. यातच आरपीआय अध्यक्ष आणि भाजप सरकारमधील केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या प्रकरणी ठोस भूमिका न घेतल्याने अनेक आरपीआय पदाधिकारी राजीनामे देत असल्याचे दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमधील आरपीआय शहराध्यक्ष शंकर वाघमारे, उपाध्यक्ष राहुल बोकेफोडे, सरचिटणीस नितीन म्हस्के यांनी पदाचे राजीनामे दिले असून पदाधिकाऱ्यानी आठवलेंवर उघड नाराजी व्यक्त केली आहे.

शौर्यदीना निमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायी भीमा कोरेगाव येथे आले होते. याच दरम्यान दोन गटांमध्ये अचानक झालेल्या दगडफेकीचे रूपांतर हिंसाचारात झाले. यामध्ये अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली तर दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ काल बुधवारी आंबेडकरी संघटनांनकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. राज्यभरात महाराष्ट्र बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

या सर्व घटना होत असतांना आंबेडकरी जनतेने, ज्यांना आपला नेता मानतो असे रामदास आठवले यांनी सरकारला याचा जाब विचारण्याच सोडून ते त्यांचीच पाठराखण करत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.Loading…
Loading...