भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर वाढती नाराजी

वारंवार भेटीची वेळ मागूनही मिळत नाही

टीम महाराष्ट्र देशा: भाजप सरकारमध्ये वरिष्ठ नेत्यांवर पक्षातीलच अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही महिन्यांपूर्वी खासदार नाना पाटोले यांनी वरिष्ठ नेते वेळ देत नाहीत म्हणून राजीनामा दिला होता. आता भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी सुद्धा नेत्यांवर नाराजी व्यक्त करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मला अनेक विषयांवर बोलायचे होते. मात्र, वारंवार त्यांच्या भेटीची वेळ मागूनही ते मला एकदाही भेटले नाहीत. त्यामुळेच मी माझे विचार जनतेसमोर मांडण्याचा निर्णय घेतला आहे.  जबलपूरमधील एका कार्यक्रमात बोलत असतांना सांगितले.

bagdure

म्हणाले यशवंत सिन्हा?

१३ महिने झाले तरी मला वरिष्ठ आणि महत्त्वाच्या नेत्यांना भेटायलाही पक्षाध्यक्षांना वेळ मिळत नाही. याचं आश्चर्य वाटत नाही. १३ महिन्यांपूर्वी मी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मोदींच्या भेटीची वेळ मागितली होती. ती अद्यापही मिळू शकली नाही. त्यामुळं आता मी यावर कुणाशीही चर्चा करणार नाही. जे बोलायचे ते जाहीरपणे बोलणार आहे. भाजप पक्ष अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांच्या काळातील राहिलेला नाही.

You might also like
Comments
Loading...