जीवे मारण्याची धमकीनंतर गौतम गंभीरच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ

जीवे मारण्याची धमकीनंतर गौतम गंभीरच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ

गौतम गंभीर

नवी दिल्ली: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली मतदारसंघाचा खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गौतम गंभीरने यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. गौतम गंभीरने जीवे मारण्याची धमकी आल्यासंदर्भात तक्रार नोंदवली आहे, अशी माहिती दिल्ली मध्यच्या पोलीस उपायुक्त श्वेता चौहान यांनी दिली आहे.

गंभीरच्या कार्यालयामधून यासंदर्भातील एक पत्र पोलिसांना पाठवण्यात आलं आहे. या पत्रामधील मजकुरानुसार गंभीरला त्याच्या ई-मेलवरुन ही धमकी देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणानंतर आता गौतम गंभीर यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Gautam Gambhir Complains death threats from'ISIS Kashmir' delhi police probes | Delhi News (दिल्ली समाचार)

गौतम गंभीरला आणि त्याच्या परिवाराच्या जीवाला धोका असल्याने त्याच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या संपूर्ण प्रकारचा पोलीस अधिक तपास करत आहे. मात्र या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान, २३ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ९ वाजून ३२ मिनिटांनी आलेल्या एका ई-मेलमध्ये खासदार गौतम गंभीर आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये तुम्ही लक्ष घालून तपास करावा, असं पत्रात सांगण्यात आले आहे.

हत्वाच्या बातम्या: