फडणवीस सरकारच्या काळात जातीय तणावात वाढ, पोलीस खात्याचा धक्कादायक अहवाल

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील जातीय तणावाचा धक्कादायक अहवाल पोलीसांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील जातीय तणाव वाढलं असल्याच या अहवालातून समोर आलं आहे. हिंदु-मुस्लिम तणावाची जागा गेल्या पाच वर्षात सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणावाने घेतली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात नेमक चाललंय तरी काय ? असा प्रश्न पडू लागला आहे.

मुंबईत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला होता. त्यात पोलीस खात्याने राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेसंदर्भात एक सादरीकरण केले. ज्यामध्ये राज्यातील हिंदू-मुस्लीम तणावाची जागा गेल्या पाच वर्षात सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणावाने घेतल्याचा अहवाल पोलिस खात्याने निवडणूक आयोगाला दिला.

या अहवालानुसार, हिंदू-मुस्लीम धर्मियांतील तणावासाठी राज्यातील 8 जिल्हे संवेदनशील आहेत. तर त्या तुलनेत सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणाव असलेले 14 जिल्हे आहेत. पालघर, ठाणे, पुणे, सोलापूर, अहमदनगर, बुलढाणा, वाशिम आणि औरंगाबाद हे जिल्हे मुस्लिम आणि हिंदु धर्मियातील तणावाच्या घटनांसाठी संवेदशील आहेत. तर गेल्या काही वर्षात राज्यात हिंदु-मुस्लिम तणावापेक्षा सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणाव राज्यात वाढला आहे.