ऑलिम्पिक स्पर्धेत कोरोनाचा वाढला प्रादुर्भाव; दुसऱ्या खेळाडूला झाली लागण

मुंबई : जागतीक स्तरावर सर्वात मोठी समजली जाणारी क्रिडा स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिक येत्या २३ जुलै पासुन टोकियो येथे सुरु होत आहे. निर्धारीत कार्यक्रमानुसार मागील वर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा यावर्षी आयोजीत करण्यात येणार आहे.

मात्र स्पर्धेला काही दिवसावर येऊन ठेपलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेवर कोरोनाचे सावट वाढत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार स्पर्धेत सहभागी दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यात एक खेळाडू हा चेक प्रजासत्ताकचा पेरुचीस या व्हॉलीबॉलपटु आहे. तर अमेरिकेच्या जिन्मॅस्टीक खेळाडूलाही लागण झाली आहे.

तसेच स्पर्धेशी संदर्भात अनेक सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. ही स्पर्धा आयोजीत करण्यावरुन वाद सुरु होता. गेल्या वर्षापेक्षा यावर्षी कोरोनाचे सावट जरी कमी झाले आहे. तरीही कोरोनाच्या सावटाखाली स्पर्धा आयोजीत करणे हे धोक्याचे ठरणार असा वाद सुरु होता. यादरम्यान कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूंना विलगीकरणात ठेवले असुन त्याच्यावर उपचार सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP