परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाच्या कामाची गती वाढवा, म.ज.वि.प.ची मागणी

Increase work speed on Parli-Beed-Ahmednagar railway line, demand of MJVP

बीड : अनेक वर्षांपासून रखडलेल्या परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाची प्रवाशांना प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्याच्या हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. केंद्र सरकारकडून या बहुप्रतीक्षित मार्गाला मंजुरी मिळूनही या रेल्वेमार्गाचे काम पुढे सरकत नाही.

या प्रश्नावर मराठवाडा जनता परिषदेच्या जिल्हा कार्यकारिणीने नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाच्या कामाची गती वाढवण्यात यावी, असा सूर निघाला आहे. यासंदर्भातील वृत्त औरंगाबाद आकाशवाणीने प्रसारित केले आहे.

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या या बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेंद्र आगवान, केंद्रीय शहरसचिव प्रा. डॉ. डी. एच. थोरात, जिल्हा सचिव सुमंत गायकवाड, अविनाश वाघीरकर, शिरीष देशमुख यांच्यासह इतर प्रमुख आणि ज्येष्ठ सदस्यांची यावेळी उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या