कोरोनाचे प्रमाण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये लसीकरण वाढवा; आरोग्यमंत्री टोपेंचे आदेश

rajesh tope

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. २०२० देशात शिरकाव केलेल्या रोगाने अक्षरशः थैमान घातले. दुसऱ्या लाटेत या रोगाची तीव्रता अधिक वाढल्याचे दिसून आले. यामुळे आरोग्य व्यवस्था देखील कोलमडली. तर, कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढण्यासोबतच मृत्यूचे देखील प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. यामुळे अनेक कुटुबांचा आधार गेला असून देशाची आर्थिक स्थिती देखील बिकट होत आहे.

आता कोरोनाची स्थिती आटोक्यात येत असली तरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमणाची वाढ ही चिंताजनक आहे. पश्चिम महाराष्ट्रासह विविध जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये कोरोनाचे संक्रमक वाढत असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नोडल अधिकाऱ्यांना दिले आहेत.

याबाबत राजेश टोपे म्हणतात, कोरोना संक्रमण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये लशींचे प्रमाण वाढवून देण्यात यावे, अशा सूचना नोडल अधिकाऱ्यांना केल्या आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये लसीकरण कसे वाढवता येईल, यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. यासोबतच, अधिकाधिक लोकांचे लशींचे दोन डोस लवकरात लवकार पूर्ण करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे त्यांना वेळेत दुसरी लस उपलब्ध करून देण्यासही प्राधान्य दिले जात असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या