‘रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी ग्रामीण भागात कोरोना केअर सेंटरची संख्या वाढवा’

covid-

सातारा : महाराष्ट्रात शहरी भागापेक्षा आता ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. ग्रामीण भागात गृह विलगीकरणात असलेले रुग्ण जागेअभावी त्यांच्याकडून नियम पाळले जात नाहीत. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी ग्रामीण भागात कोरोना केअर सेंटरची संख्या वाढवावी, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज सांगितले.

गोंदवले बु. येथील चैतन्य कोविड सेंटरचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (ऑन लाईन), पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण ) राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार जयकुमार गोरे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी, तहसिलदार बाई माने, अनिल देसाई यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या संकटात वैद्यकीय सेवेचे विकेंद्रीकरण केले पाहिजे. यातून आणखी आरोग्य सुविधा वाढविल्या पाहिजेत. यापुढे कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी नागरिकांनी घाबरुन न जाता शासन, प्रशासनाला साथ द्या. तुमच्यासाठी माण येथील आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी गोंदवले महाराज ट्रस्टने मोठी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. याला शासन पूर्णपणे मदत करेल, असे आश्वासनही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिले.

महत्वाच्या बातम्या 

IMP