करमाळा तालुक्यात टेस्टिंग वाढवून जेऊर मध्ये कोविड सेंटर चालु करा- मनसे

करमाळा : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. सुरुवातीला ग्रीन झोनमध्ये असणारा सोलापूर जिल्हा आता चांगलाच कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे.करमाळा तालुक्यात देखील कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात टेस्टिंग वाढविण्याची मागणी मनसेने केली आहे. तसेच करमाळा तालुक्यातील जेऊर येथील उपजिल्हा रुग्नालय कोविड सेंटर साठी शासनाने मंजुरी दिली असुन ती लवकराक लवकर चालु करावे अशी मागणी मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष आनंद मोरे यांनी केली.

संपुर्ण राज्यासह आता कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागात होऊ लागला आहे. करमाळा तालुक्यात कोरोनाची संख्या शेकडो वर गेली आहे करमाळा शहराबरोबर आता ग्रामीण भागात कोरोना ने डोके वर केले असुन जेऊर व परिसरामध्ये कोरोना चे रुग्ण अढळल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या रुग्णाची सोय व्हावी म्हणुन जेऊर येथील उपजिल्हा रुग्नालय कोविड सेंटर साठी खुले करावे व रुग्णाची गैरसोय टाळावी. जेऊर व परिसरातील पॉझिटिव्ह रुग्ण हे जेऊर कोविड सेंटर मध्ये ठेवावे अशी मागणी मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष आनंद मोरे यांनी केली.

टेस्टिंग वाढविल्यास या विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी ‘महाराष्ट्र देशा’ बरोबर बोलताना व्यक्त केला. हे निवेदन देते वेळी मनसे विद्यार्थी सेना जिल्हा संपर्क अध्यक्ष विजय रोकडे, जिल्हा अध्यक्ष सतिश जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, फंड, तालुका अध्यक्ष राहुल मंगवडे, करमाळा शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे अदि उपस्थित होते.

मराठा आंदोलन: अखेर न्याय मिळाला, मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी आणि १० लाख रुपये

…हा मराठा समाजाच्या एकीचा विजय: खा. संभाजीराजे छत्रपती

मीच फक्त मॅच्युअर आणि बाकी सारे… शौमिका महाडिक यांचा पवारांना अप्रत्यक्ष टोला