भाजपचे नगरसेवक हरिदास चरवड यांच्या अडचणीत वाढ

haridas charwad

पुणे: प्रभाग क्रमांक ३३ चे भाजप नगरसेवक हरिदास चरवड यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमानतपत्र रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. चरवड यांनी निवडणुकीवेळी कुणबी मराठा असल्याचे जात प्रमाणपत्र सादर केले होते. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणून लढवलेले अक्रूर कुदळे यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

२०१६ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत हरिदास चरवड यांनी कुणबी मराठा असल्याचे जात प्रमाणात निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केले होते. चरवड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अक्रूर कुदळे यांचा पराभव केला होता. मात्र ओबीसीसाठी राखीव असणाऱ्या जागेवर चरवड यांनी खोटे जात प्रमाणपत्र देऊन निवडणूक लढवल्याचा आरोप कुदळे यांच्याकडून करण्यात आला. आज या याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने चरवड यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने पुढील तीन महिन्यांत यावर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे हरिदास चरवड यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान मागील १५ दिवसांपूर्वी चरवड हे चिट्टीद्वारे स्थायी समितीमधून देखील बाहेर पडले आहेत.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...