घाटीतून अपहरण करत दहा हजारांची खंडणी मागणाऱ्या तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ

औरंगाबाद : उपचारासाठी घाटी रुग्णालयात आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाचे अपहरण करुन जीवे मारण्याची धमकी देत दहा हजार रुपयांची खंडणी घेतल्या प्रकरणी तिघा आरोपींच्या कोठडीत १६ जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी सोवमारी दि.१४ दिले. सिकंदर मुकीम पठाण (४०), शाहरुक सिकंदर पठाण (१८, सर्व रा. गल्ली नं.५, मिसारवाडी) आणि इश्वर विठ्ठल दिशागज (२९, गल्ली नं. ६ मिसारवाडी) अशी आरोपींची नावे असून त्यांना १० जून रोजी अटक करण्यात आली.

प्रकरणात विष्णु रमेश पवार (२१, रा. चापनेर ता. जाफ्राबाद जि. जालना) याने फिर्याद दिली. त्यानूसार, विष्णुच्या वडीलांना म्युकरमायकोसिसचा आजार झाल्याने त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या देखीभालीसाठी विष्णु आणि त्याचा मामा कृष्णा वाघ हे घाटीत थांबलेले आहेत. ९ जून रोजी सकाळी आठ वाजता कृष्णा हे दुध आणण्यासाठी पोलीस चौकीसमोरील हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी एकजण त्यांच्या जवळ आला व त्याने फोन करण्यासाठी कृष्णा यांच्याकडून मोबाइल घेतला व पळून गेला. तत्पूर्वी आरोपीने त्याचा जूना मोबाइल कृष्णाजवळ ठेवला होता. १० जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विष्णू आणि कृष्णा घाटीच्या मेडीसीन विभागाच्या इमारतीजवळ उभे असतांना तेथे तीन जण आले. त्यांनी कृणा वाघ यांना बळजबरी मकई गेटच्या दिशेने नेले. तेथे कृष्णाला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत विष्णूला फोन करुन २० हजार रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या विष्णूने फोन पेव्दारे आरोपींना १० हजार रुपये दिले. प्रकरणात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी आरोपींनी फिर्यादीच्या मामाचे अपहरण करुन कोठे डांबले होते याचा तपास करणे आहे. आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहे का याचा तपास करणे असल्याने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली.तपास करणे आहे. आरोपींनी पुणे येथुन चोरलेली दुचाकी सिल्लोड येथे विक्री केली आहे, ती जप्त करणे आहे. गुन्ह्यात आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

महत्त्वाच्या बातम्या

IMP