मशिदी समोरील दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याच्या पोलिस कोठडीत वाढ

jail

औरंंगाबाद : खडकेश्वर येथील मशिदी समोरील गल्लीत हॅन्डल लॉक करुन उभी केलेली दुचाकी चोरणाऱ्या अतिक शेख लतीफ शेख (वय ३०, रा. आलमजिर कॉलनी, साजापुर औरंगाबाद) याच्या पोलीस कोठडीत गुरुवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी पी.पी. मुळे यांनी दिले.

पानचक्की येथे राहणारे अब्दुल जब्बार शब्बीर शेख (वय ४९) हे गेल्या चार वर्षांपासून मीत्र शेख शोएब यांच्या नावे असलेली दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीआर-४५८५) वापरतात. २७ जून रोजी दुपारी अब्दुल जब्बार हे खडकेश्वर येथे गेले होते.

त्यावेळी चोरट्यांनी आझाद अली शाह मशिदी समोरील गल्लीतून दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP