मुंबईत हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ

mosquitoes

मुंबई : मुंबईत हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत मलेरियाचे तब्बल ५५८ रूग्ण तर, डेंग्यूचे ४९ रूग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने या पाण्यात डेंग्यू व हिवतापाच्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढतो. महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, परळ, शिवडी, लालबाग, काळाचौकी, वरळी, कोळीवाडा, जिजामाता नगर, धईघाट, धारावी,माटुंगा लेबर कॅम्प, माहीम, कांदिवली, बोरिवली, दहिसर, गणपत पाटील नगर आणि मुलुंड या भागात मलेरिया व डेंग्यूच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील विविध शासकीय रूग्णालयात तापाच्या ४ हजार ३३९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती अधिका-यांकडून देण्यात आली.Loading…
Loading...