स्वाभिमानी बाणा जपणाऱ्या सुपरस्टार रजनीकांत यांच्या सुरक्षेत वाढ

टीम महाराष्ट्र देशा : दक्षिणेतील द्रविडी चळवळीचे नेते पेरीयार रामास्वामी यांच्याबद्दल सुपरस्टार रजनीकांत यांनी केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला असून आज मंगळवारी तामीळनाडूतील विविध संघटनांनी रजनीकांत यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला. इतकेच नाही तर त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

पेरीयार ई. व्ही. रामास्वामी हे हिंदू देवतांवर कठोर शब्दांत टीका करायचे. 1971 साली एका सभेत राम आणि सीता यांची आक्षेपार्ह छायाचित्रे झळकवण्यात आली होती त्यावर कुणी काहीच बोलले नाही असा दावा रजनीकांत यांनी केला होता. ‘तुघलक’ या तमिळ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पेरीयार यांच्याबद्दलची भूमिका मांडली होती.

Loading...

राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटना पेरियार यांचा अपमान केल्याचा रजनीकांत यांच्यावर आरोप करीत आहे तर काही लोक माफीची मागणी करीत आहेत. द्रविदार विदुथुलाई कझगम या पक्षाने रजनी यांच्या विरुद्ध गुन्हा देखील दाखल केला आहे. थंथाई पेरियार द्रविधर कझगम या संस्थेच्या सदस्यांनी रजनीकांत यांच्या घराजवळ त्यांच्या विरुद्ध जोरदार नारे देत विरोध प्रदर्शन केले.

दरम्यान, दबावतंत्राला न घाबरता आपला स्वभिमानी बाणा जपला आहे. रजनीकांत यांनी आपण जे बोललो त्यात चुकीचे काहीच नव्हते. त्यामुळे आपण माफी मागणार नाही असे ठामपणे म्हटले आहे. पेरियार प्रकरणार सुरु असलेल्या वादामुळे तसेच विविध संघटनांच्या प्रदर्शनामुळे सुपरस्टार रजनीकांत यांच्या चेन्नई स्थित पॉश गार्डन निवासस्थानी पोलिसांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात