Share

Sanjay Raut | संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच होणार, न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ!

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत आहेत. यादरम्यान, त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. उद्या शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडत आहे मात्र संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ झाल्यामुळे राऊत यांचा दसरा मेळावा तुरुंगातच होणार असल्याचे दिसून येत आहे. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये न्यायालयाने त्यांच्या 10 ऑक्टोंबर पर्यंत वाढ केली आहे.

काय आहे प्रकरण :

1034 कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्यातील आरोपी संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. तुरुंगाच्या कोठडीत संजय राऊत यांची रोजचा दिनक्रम समोर आला होता. तुरुंगात संजय राऊत आपला जास्तीत जास्त वेळ अभ्यास आणि लेखनात घालवतात. त्यांना कोणत्याही प्रकारची व्हीआयपी वागणूक देण्यात आलेली नाही. शिवसेना खासदार संजय राऊत सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत. कैदी क्रमांक 8959 अशी त्यांची ओळख आहे.

राऊतांच्या विरोधातील काही पुरावे सापडल्याने त्यांचा मीन मंजूर केला नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यामुळे राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ होणार हे स्पष्ट आहे.

दरम्यान, संजय राऊत यांना सामान्य नियमांनुसार इतर कैद्यांना ज्या सुविधा दिल्या जातात त्याच सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यांना लिहिण्यासाठी पेन आणि रजिस्टर देण्यात आले आहेत. मात्र ते लिखाण तुरुंगातून बाहेर जाऊ नये, तसेच कारागृहात काय लिहितात, याची पुरेपूर काळजी कारागृह प्रशासन घेत आहे. लिहिण्याव्यतिरिक्त ते बातम्या वाचतात. इतर कैद्यांप्रमाणे त्यांचा दिनक्रमही नियमांनी बांधलेला असतो.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत आहेत. यादरम्यान, त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now