नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणीपात्रात वाढ

टीम महाराष्ट्र देशा : नाशिक मध्ये गेल्या तीन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंगसुरु असून, गोदावरी नदीच्या पाणीपात्रात देखील वाढ झाली आहे. पुराचा पहिला इशारा देणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले असून, लक्ष्मणपूल, रामसेतुसह अनेक छोटे पूल आणि मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिकमध्ये आज सकाळी 36 मिमी पावसाची नोंद झाली, तर जिल्ह्यात इगतपुरी 216 ,पेठ- 119  त्र्यंबक 88  आणि सुरणामध्ये 73 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे, नाशिकमधील गंगापूर धरण 74% भरले आहे. गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असून यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू

नगर जिल्ह्याला चांगले झोडपल्यानंतर पावसाने घेतली थोडी विश्रांती

You might also like
Comments
Loading...