राज कुंद्राच्या अडचणीत वाढ ; कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

raj kundra

मुंबई : काल सायंकाळी प्रसिद्ध उद्योगपती आणि बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. फेब्रुवारी २०२१मध्ये राज कुंद्रा विरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. अश्लिल व्हिडीओ चित्रीत करुन तो समाजमाध्यमावर प्रसिद्ध करण्याचा प्रकार समोर आला होता. याच प्रकरणात प्राथमीक तपासणीत राज कुंद्रा यांचे नाव समोर आले. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या हाती पुरवे लागल्यानंतर त्यांनी राज कुंद्रा यांना अटक केली.

दरम्यान, आता राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज राज कुंद्रा आणि दुसरा आरोपी रायन जॉन मायकल थार्प (४३) या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यापैकी राज कुंद्राला सोमवारी रात्री तर थार्पला आज सकाळी अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे. इतर दहा आरोपी जामिनावर मुक्त आहेत.

दरम्यान राज कुंद्रावर यापुर्वीही पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. मार्च २०२० मध्ये मुंबई येथे राहणारे सचिन जोशी यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी संबंधित आर्थीक व्यवहारावरून ही तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र यामुळे राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीचा आगामी चित्रपट ‘हंगामा २’ अडचणीत येण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP