रस्ते अपघातातील पीडितांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ

नवी दिल्ली – रस्ते अपघातातील पीडितांना मिळणाऱ्या किमान नुकसान भरपाईच्या रकमेत १० पटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तब्बल २४ वर्षांनंतर वाहतूक मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना, जखमी आणि अपंगत्व आलेल्यांना, तसंच किरकोळ जखमींना १० पट नुकसान भरपाईमिळणार आहे

नवीन नियम लवकरच लागू होणार आहे. त्यानुसार, अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये, अपंगत्व आल्यास ५० हजार ते पाच लाख रुपये देण्यात येतील. त्यात दरवर्षी पाच टक्के वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद पीडितांना तात्काळ दिलासा देण्यासाठी करण्यात आली आहे. नुकसान भरपाईच्या रकमेत वाहनधारकासाठी असलेल्या थर्ड पार्टी प्रिमिअममध्ये वाढ करण्यात आली आहे.

You might also like
Comments
Loading...