fbpx

आणखी दोन नेत्यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

income tax

टीम महाराष्ट्र देशा- काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमरिश पटेल यांच्या शिरपूरमधील घरावर आयकर विभागाने छापे टाकले. उद्योग क्षेत्रात असलेल्या भागिदारीप्रकरणी आयकर विभागाकडून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या धुळ्यातील घरावरही छापे टाकण्यात आल्याचे सांगितले जाते.

याप्रकरणी काही राजकीय नेत्यांच्या तसेच व्यापारी आणि उद्योजकांच्या निवासस्थानी आयकर विभागाकडून तपासणी सुरू असल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे.आयकर विभागाने राजवर्धन कदमबांडे यांच्या धुळ्यातील तर अमरिश पटेल यांच्या शिरपूर इथल्या निवासस्थानी आज सकाळी 9 च्या सुमारास कारवाईला सुरुवात केली. दोन्ही ठिकाणी सुरु असलेल्या चौकशी पथकात सुमारे 25 पेक्षा अधिक सदस्य आहेत.जिल्ह्यातील दोन्ही नेत्यांच्या घरी एकाच वेळी छापा टाकण्यात आल्याने राजकीय-उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.